जगातील सातव्या आश्चर्यांपैकी एक कुतुब मीनार, देशाची राजधानी दिल्लीत स्थित आहे.
ही ऐतिहासिक वास्तु गुलाम वंशाचा शासक कुतुबुद्दीन ऐबक याने बांधली.
दरवर्षी लाखोंच्या संख्येने लोक हा मीनार बघायला गर्दी करतात, पण फक्त बाहेरूनच.
असं काय आहे की कुतुब मीनारच्या आत जाण्यास लोकांना बंदी आहे.
खरंतर एक काळ असा होता की सर्वसामान्य व्यक्ति, लहान मुले कुतुब मीनारच्या छतावरून संपूर्ण दिल्ली शहर दृष्टिक्षेपात घ्यायचे.
परंतु 4 डिसेंबर 1981 साली कुतुब मीनारच्या आत काही कारणास्तव दिवे गेले आणि अंधार झाल्यामुळे आतमध्ये बराच गोंधळ निर्माण झाला.
या गोंधळात आतमधील गोल शिड्यांवरून घसरून 50 लोक मृत्युमुखी पावले होते, ज्यात मुख्यत्वे लहान मुलांचा समावेश होता.
भारतीय पुरातत्व विभागाने या दुर्घटनेला 'ब्लॅक डे' असे नाव दिले.
या हृदयद्रावक घटनेनंतर कुतुब मीनारच्या आत जाण्यास बंदी केली.