धक्काधक्कीच्या जिवनातून वेळ काढून अनेकजण मंदिरात जातात.
हजारो लोक मंदिरात देव दर्शनासाठी जातात. त्यावेळी प्रवेशद्वाराजवळ घंटा वाजवतात. पण यामागचे कारण अनेकांना माहिती नसते.
हिंदु धर्माच्या मान्यतेनुसार, घंटा वाजवल्याने मंदिरातील मुर्त्यांमध्ये चेतना जागृत होते.
यामुळे भाविकांची पूजा, आराधना फलदायक आणि प्रभावशाली होते.
वैज्ञानिक कारणानुसार, घंटा वाजवल्याने मनुष्याची चेतना जागृत होते आणि तो पुजेमध्ये लक्ष केंद्रीत करतो.
घंटा वाजवल्याने अशांत मन शांत होण्यास मदत होते.
घंटा वाजवल्याने मंदिराच्या वातावरणात चैतन्य निर्माण होते.
घंटेच्या आवाजाने आळस दूर होतो आणि आपली एकाग्रता वाढते.
याचा लहान मुलांवर चांगला प्रभाव पडतो.