गरम केल्यानंतर दूध ऊतू जातं, पण मग पाणी का नाही?

दूध गरम करताना आपल्याला वारंवार त्याच्यावर लक्ष ठेवावं लागतं. कारण गरम झाल्यानंतर दूध हे ऊतू जाण्याची भीती असते.

Jul 17,2023

यामागील कारण काय?

जर आपलं लक्ष नसेल आणि वेळेत गॅस बंद केला नाही तर, दूध भांड्यातून बाहेर येतं आणि सगळ्या गॅसवर पडतं.

कधी विचार केला आहे का?

पण कधी पाणी गरम करताना ते भांड्याच्या बाहेर का येत नाही? असा विचार तुम्ही कधी केलाय का?

यामागे वैज्ञानिक कारण

पाणी कितीही गरम केलं तरी कधीही भांड्याच्या बाहेर पडत नाही. पण दूध मात्र लगेच बाहेर येतं. यामागे एक वैज्ञानिक कारण आहे.

दूध आणि पाण्यात फरक

दूधात असणारे फॅट, प्रोटीन, कार्बोहायड्रेट, विटॅमिन वजनाने हलके असतात. ज्यामुळे गरम झाल्यानंतर ते दूधाच्या वर तरंगत एक थर बनवतात आणि खालच्या भागात फक्त पाणी राहतं.

फॅट, प्रोटीन आणि अन्य गोष्टी

आता खाली राहिलेल्या मिश्रणात पाणी जास्त असतं, जे गरम झाल्यानंतर वाफ तयार करतं. पण वरती असणारे फॅट, प्रोटीन आणि अन्य गोष्टी वाफेला मार्ग देत नाहीत.

वाफेमुळे दूध येतं बाहेर

जास्त जोर असल्याने पाणी थराला भेदत वाफेप्रमाणे उडतं आणि थराला खाली टाकतं. ज्यामुळे दूध भांड्यातून बाहेर पडू लागतं.

मग पाणी का बाहेर पडत नाही?

तर दुसरीकडे जेव्हा भांड्यात पाणी उकळत असतं तेव्हा ते मोकळं असतं. त्याच्यावर कोणताही थर नसल्याने वाफ सहजपणे निघून जाते आणि ते उकळत राहतं.

VIEW ALL

Read Next Story