महिलांचं गुलाबी रंगाशी काय नातं? जाणून घ्या रंजक कहाणी!

Pravin Dabholkar
Mar 08,2024


महिलांशी गुलाबी रंग जोडला जातो. असं का? यामागे एक रंजक कहाणी आहे.


काही ठिकाणी सरकार महिलांकडून पिंक टॅक्स वसूल करते.पिंक टॅक्स हा अधिकृत कर नाही. ही एक अदृश्य किंमत आहे जी स्त्रियांच्या खास उत्पादनांसाठी आणि सेवांसाठी आकारण्यात येते.


मुले पिंक रंगापासून स्वत:ला दूर ठेवतात. लोक माझी खिल्ली उडवतील असं त्यांना वाटतं.


मुलांसाठी निळा तर मुलींसाठी पिंक कलर असल्याचे आपण सोशल मीडियात पाहिले असेल.


आधी निळा रंग महिलांचा तर गुलाबी रंग पुरुषांचा होता.


पहिल्या महायुद्धाआधी पाश्चिमात्य देशांमध्ये मुलांना पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केले जायचे. हळुहळू त्यात गुलाबी आणि निळ्या रंगाचा समावेश करण्यात आला.


त्यावेळी गुलाबी रंग पुरुषत्वाचा मानला जायचा तर निळा रंग नाजुक मानला जायचा.


मुलींचा पिंक रंग होण्यात 2 प्रसिद्ध पेंटींग्जचा हात आहे. पिंकी आणि द बॉयज नावाने ही पेंटीग्ज प्रचलित आहे.


यामध्ये मुलगा निळ्या रंगामध्ये तर मुलगी पिंक रंगामध्ये दाखवण्यात आला. हळुहळू हा रंग प्रचलित झाला.

VIEW ALL

Read Next Story