संपूर्ण जगाला गुरुमंत्र देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचा 23 वर्षांचा राजकीय अनुभव सांगितला आहे.
जगभरातील सरकारच्या प्रतिनिधींना सल्ला देताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, सरकार असे असले पाहिजे की ते सर्वांना बरोबर घेऊन जाईल.
लोकांच्या जीवनात सरकारी हस्तक्षेप कमीत कमी होईल याची खात्री करणे हे सरकारचे काम आहे, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
भारतात गेल्या काही वर्षांत सरकारवरील लोकांचा विश्वास वाढला आहे, असे पंतप्रधान मोदींनी सांगितले.
भारत सरकारच्या हेतूंवर आणि वचनबद्धतेवर जनतेचा विश्वास आहे. आम्ही जनभावनांना प्राधान्य दिल्यानेच हे शक्य झाले आहे.
गुजरातचा मुख्यमंत्री आणि भारताचा पंतप्रधान या नात्याने मी सरकारमध्ये 23 वर्षे घालवली आणि 'किमान सरकार, कमाल प्रशासन' हे माझे तत्व आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
मी नेहमीच असे वातावरण निर्माण करण्यावर भर दिला आहे ज्यामुळे नागरिकांमध्ये उद्यम आणि ऊर्जा दोन्ही वाढेल. आम्ही टॉप डाउन आणि बॉटम-अप दृष्टिकोन तसेच संपूर्ण समाजाचा दृष्टिकोन फॉलो केला आहे.
"सबका साथ-सबका विकास' या मंत्राला अनुसरून आम्ही लास्ट माईल डिलिव्हरी आणि सॅच्युरेशनच्या दृष्टिकोनावर भर देत आहोत. सॅच्युरेशनचा दृष्टिकोन म्हणजे कोणताही लाभार्थी सरकारी योजनांचा लाभ मिळण्यापासून वंचित राहू नये.