IPL

IPL च्या प्रत्येक पर्वातून SRK किती कमवतो?

May 01,2024

गडगंज कमाई

चित्रपट, जाहिराती आणि निर्मिती संस्थांच्या माध्यमातून शाहरुख खान कोट्यवधींची कमाई करतो. याशिवाय आयपीएलच्या माध्यमातूनही तो गडगंज कमाई करतो.

कोट्यवधींची कमाई

आयपीएलच्या प्रत्येक पर्वामध्ये शाहरुख खान कोट्यवधींची कमाई करतो. BCCI कडून प्रत्येक संघाला प्रक्षेपणासह स्पॉन्सरशिपच्या कमाईतून काही भाग देण्यात येतो.

ब्रँड एंडोर्समेंट

शाहरुखला केकेआरच्या ब्रँड एंडोर्समेंट, फ्रँचायझी फी, इवेंट रिवेन्यू आणि प्राईज मनीसुद्धा मिळते, ज्यामाध्यमातून त्याला एक मोठी रक्कम मिळते.

नेमकी किती कमाई?

शाहरुख खान आयपीएलच्या एका हंगामातून नेमकी किती कमाई करतो याची अधिकृत आकडेवारी अद्याप समोर येऊ शकलेली नाही.

250 ते 270 कोटी रुपयांची कमाई

सूत्रांच्या माहितीनुसार तो साधारण 250 ते 270 कोटी रुपयांची कमाई करतो. शाहरुखच्या खात्यातील कमाईत येणाऱ्या रकमेपैकी 100 कोटी रुपये खेळाडूंची खरेदी आणि संघ व्यवस्थापनावर खर्च केले जातात.

उर्वरित रक्कम

उरलेल्या 150 कोटी रुपयांपैकी 55 टक्के रक्कम केकेआर आणि शाहरुखकडे राहते.

हिशोब पाहता...

सर्व हिशोब पाहता शाहरुखला सरतेशेवटी आयपीएलच्या एका हंगामाअखेर साधारण 80 कोटी रुपये मिळतात.

VIEW ALL

Read Next Story