मॅथ्यू वेड

गुजरात टायटन्सचा हुकमी एक्का म्हणजे मॅथ्यू वेड. ऑस्ट्रेलियन विकेटकिपर मॅथ्यू वेड (Matthew wade) आक्रमक फलंदाजीठी ओळखला जातो. गेल्या हंगामात त्याने केवळ 157 धावा केल्या. पण या हंगामात तो चांगलाच फॉर्मात आहे.

Mar 27,2023

मनीश पांडे

टीम इंडियाचा आणखी एक युवा आणि आक्रमक फलंदाज म्हणजे मनीष पांडे (Manish Pandey). ऑरेंज कॅपच्या शर्यतीत मनीष पांडेही प्रमुख दावेदार आहे. एकहाती सामना फिरवण्याची ताकद मनीश पांडेमध्ये आहे. गेल्या वर्षी तो लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळत होता. यंदा दिल्लीने त्याच्यावर बोली लावत आपल्या संघात घेतलं आहे.

व्यंकेटश अय्यर

कोलकाता नाईट रायडर्समधून खेळणाऱ्या व्यंकटेश अय्यरने (Venkatesh Iyer) गेल्या हंगामात आपल्या कामगिरीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. अय्यर फटकेबाजीसाठी प्रसिद्ध आहे. त्याला टीम इंडियातही संधी मिळाली आहे. त्यामुळे ऑरेंज कॅपसाठी अय्यरलाही दावेदार मानलं जात आहे.

रोहित शर्मा

ऑरेंज कॅपच्या शर्यतीत टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माचंही (Rohit Sharma) नाव आहे. आयपीएलच्या गेल्या हंगामात रोहितची कामगिरी अतिशय निराशाजनक होती. त्याने 19.14 च्या रनरेटने केवळ 268 धावा केल्या होत्या. पण त्याला नजरअंदाज करता येणार नाही. त्याची बॅट तळपली की धावांचा ओघ सुरु होतो.

विराट कोहली

या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे तो टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli). राजस्थान रॉयल्सकडून खेळणारा कोहली सध्या चांगल्या फॉर्मात आहे. गेल्या आठ टी20 सामन्यात त्याने 348 धावा केल्या आहेत. ऑरेंज कॅपच्या शर्यतीत यंदा तो पहिल्या क्रमांकावर आहे.

जोस बटलर

या यादीत सर्वात पहिलं नाव आहे ते राजस्थान रॉयल्सच्या जोस बटलरचं (Jos Buttler). गेल्या हंगामात बटलरने आपल्या फलंदाजीने धुमाकूळ घातला होता. तब्बल 4 शतकं आणि 4 अर्धशतकांच्या मदतीने त्याने तब्बल 863 धावा केल्या होत्या. या कामगिरीच्या जोरावर तो ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला होता. यंदाही अशीच कामगिरी करण्यासाठी तो पुन्हा एकदा सज्ज झाला आहे.

VIEW ALL

Read Next Story