आवळा खाण्याचे 10 जबरदस्त फायदे

Pooja Pawar
Jan 31,2025


आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी चे भरपूर प्रमाण असून यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढते.


आवळ्यामधील पोषकतत्वामुळे केस मजबूत होतात, पांढरे होण्याचे प्रमाण कमी होते आणि कोंडा दूर होतो.


आवळा पोटाच्या समस्यांना दूर ठेवते आणि पचनक्रिया मजबूत होते.


आवळा ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित करण्यास मदत करतो.


आवळ्याच्या सेवनाने मेटाबॉलिज्म वेगाने होऊन फॅट बर्न करण्यास मदत होते.


आवळ्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होते आणि हृदय रोगाचा धोका कमी होतो.


आवळ्यात असणारे अँटिऑक्सिडंट गुण त्वचेला तरुण ठेवतात आणि ज्यामुळे पिंपल्स येणं कमी होतं.


आवळ्यात व्हिटॅमिन ए असतं ज्यामुळे डोळे निरोगी राहतात.


आवळ्याच्या सेवनाने टॉक्सिन्स निघण्यास मदत होते आणि त्यामुळे लिव्हर निरोगी राहते.


आवळ्याच्या सेवनाने कॅल्शियम शरीरात शोषण्यास मदत होते ज्यामुळे हाडं मजबूत राहतात.


(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

VIEW ALL

Read Next Story