वजन कमी करणं अनेकांसाठी खूप कठिण असतं. त्यामुळं तुमच्या रोजच्या आयुष्यात काही सवयींत बदल करुन पाहा
वेट लॉससाठी तुम्ही डेली रुटीनमध्ये 5 बदल करा. तुमचं वजन 30 दिवसांत कमी होईल.
तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर ब्रेकफास्टवर लक्ष द्या. प्रोटीनयुक्त ब्रेकफास्ट केल्याने क्रेविंग आणि कॅलरी इनटेक कमी होईल.
नाश्तात अंड, दही किंवा प्रोटीन स्मूदीसारखे पदार्थ खा. ज्यामुळं पोट दिवसभर भरल्यासारखं राहिल आणि ताजेतवाने राहाल
जेवणाच्या आधी 10 किंवा 5 मिनिटे आधी पाणी प्या. जेवणाआधी ज्यांनी 12 आठवड्यापर्यंत पाणी प्यायले त्यांचे वजन कमी झाले असं एका संशोधनात आढळले आहे.
पाण्यामुळं पोट भरतं त्यामुळं जास्त जेवण जात नाही. वेट लॉससाठी हे खूप प्रभावी आहे
कमी कॅलरी असलेल्या पदार्थांचे सेवन करा. साखर, मीठ, अनहेल्दी फॅट्ससारखे प्रोसेस्ड फुड्सचे सेवन टाळा यामुळं वजन वाढतं
वजन कमी करायचं असेल तर डाएटबरोबरच व्यायामावरदेखील भर द्या. रोज अर्धा तास व्यायाम करा.
वजन कमी करण्यासाठी पुरेसी झोप घेणे खूप गरजेचे आहे. झोप पूर्ण झाल्यामुळं हार्मोन्स संतुलित राहतात त्यामुळं रोज 7-8 तास झोप घेणे गरजेचे