किचनमध्ये सगळ्यात भीतीदायक प्राणी म्हणजे झुरळं. झुरळं स्वयंपाक घरात फिरणं केवळ घृणास्पद नाहीच तर आरोग्यासाठी हानिकारक सुद्धा आहेत.
झुरळांना स्वयंपाक घरात येण्यापासून रोखायचे असेल तर किचन सिंकचे ड्रेन पाईप्स Mseal वापरून सील करा.
ज्या ठिकाणी झुरळांचा वावर आहे त्याठिकाणी बोरीक अॅसिड टाका.त्यामुळे झुरळं स्वयंपाक घरात येणार नाहीत.
बेकिंग सोडा आणि साखरेचे मिश्रण करून ते घरात टाकल्यास झुरळांची पैदास कमी होण्यास मदत करते.
कडुलिंबाचे तेल किंवा कडुलिंबाची पावडर स्वयंपाकघरातील झुरळं घालवण्याचा उत्तम मार्ग आहे. कडुलिंबाचे तेल पाण्यात मिसळून स्वयंपाक घरात किंवा सिंकमध्ये टाका.
काकडीची साल रात्रभर किचनमध्ये ठेवल्याने स्वयंपाकघरातील झुरळं दूर होऊ शकतात.
या तेलांचा वापर त्वचेची काळजी घेण्यासाठी किंवा इतर उपचारांसाठी केला जातो. पण त्याचबरोबर झुरळांनपासून मुक्तता मिळवायला देखील मदत करतात.
दालचिनी हा मसाल्यातील पदार्थ केवळ जेवणाची चवच वाढवत नाही तर झुरळांना दूर ठेवण्यास देखील मदत करतात.