या 8 सवयींमुळे मुलं होतात अतिशय स्मार्ट

दक्षता ठसाळे-घोसाळकर
Mar 06,2024

प्रश्न विचारणे

अनेक विद्यार्थी वर्गात आपल्या गोंधळामुळे शिक्षकांना स्पष्ट प्रश्न विचारु शकत नाही. मात्र स्मार्ट विद्यार्थी छोट्या छोट्या गोष्टी देखील शिक्षकांना विचारत असतात. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो.

नोट्स बनवणे

अनेक विद्यार्थ्यांना नोट्स बनवण्याची सवय असते. ही सवय अतिशय फायदेशीर ठरते. रिवीजन करण्यासाठी हे मुद्दे महत्त्वाचे ठरतात.

रोज अभ्यास करणे

स्मार्ट विद्यार्थी दररोज अभ्यास करण्याचा विचार करतात. कारण परिक्षेच्या काळात या मुलांना फार ताण नको असतो. अशावेळी दररोज अभ्यास करणे महत्त्वाचे ठरते.

समस्यांना सामोरे जाणे

स्मार्ट विद्यार्थी कोणत्याही परिस्थितीला अतिशय सहजपणे सामोरे जातात. यामध्ये मुलांचा आत्मविश्वास वाढतो. कारण समस्या कायमच विद्यार्थ्यांना एक पाऊल पुढे नेतात.

प्रत्येक काम वेळेत

स्मार्ट विद्यार्थी प्रत्येक काम वेळेत करण्यावर भर देतात. कारण यामुळे त्यांना अभ्यासाचा ताणही येत नाही. प्रत्येक गोष्ट वेळेत पूर्ण झाल्यामुळे मुलांना अतिशय शांतपणे सगळ्या गोष्टी करता येतात.

वेळ फूकट घालवत नाही

स्मार्ट मुलं कधीच स्वतःचा वेळ फुकट घालवत नाहीत. मिळालेल्या प्रत्येक वेळेचा ते सदुपयोग करतात. यामुळे भविष्यात त्यांना कोणताही ताण पडत नाही.

दिखाव्यापासून दूर राहणे

अनेकदा विद्यार्थी दाखवण्यात वेळ घालवतात. पण स्मार्ट मुलं असं कधीच करत नाही. स्मार्ट मुलांना कोणतीही गोष्ट दाखवावी लागत नाही. यामुळे विद्यार्थी आपल्या अभ्यासाकडे फोकस करतात.

VIEW ALL

Read Next Story