2023 या सरत्या वर्षाने बरेच अनुभव दिले. त्या गोष्टी मनात ठेवून 2024 चं स्वागत आनंदाने करावं
नवीन वर्ष सुख, समाधान आणि शांततेत जाण्यासाठी काही गोष्टी अगदी 1 जानेवारीपासूनच करा.
स्वतःला शिस्त लावा. जीवनात प्रगती करायची असेल तर शिस्त अत्यंत गरजेची आहे.
त्रास करुन घेऊ नका. कोणत्याही गोष्टीचा स्वतःला त्रास करुन घेऊ नका.
कोणताही बदल पहिला स्वीकारा आणि मग त्यावर विचार करा.
रिऍक्ट होण्यापेक्षा रिस्पॉंड करा.. अनेकदा लगेच रिऍक्ट झाल्यामुळे निर्णय चुकतात. अशावेळी विचार करुन रिस्पॉंड करा.
छोटी छोटी ध्येय डोळ्यासमोर ठेवून ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करा.
उत्तम आरोग्यासाठी प्रयत्नशील राहा. तुमचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी प्रयत्न करा.
सरत्या वर्षातील गोष्टी विसरुन नव्याने आयुष्याची सुरुवात करा. काही गोष्ट विसरणेच योग्य असते.
काही बाबतीत अज्ञानी राहा. राग, द्वेष, इर्षा या गोष्टी अज्ञानातच असलेल्या बऱ्या.