आचार्य चाणक्य यांनी नीतिशास्त्रात अशा काही लोकांचे वर्णन केले आहे जे तुम्हाला पुढे जाण्यापासून रोखतात.
आचार्य चाणक्य म्हणतात की हे 2 लोक तुम्हाला कधीच प्रगती करु देत नाहीत. नेहमी तुमच्या अपयशाचे कारण बनतात.
चाणक्य यांच्या मते, या लोकांपासून अंतर ठेवणे चांगले असते. अन्यथा त्याचे कधीही नुकसान होऊ शकते.
आचार्य चाणक्य यांनी नीति शास्त्रात म्हटले आहे की, माणसाने मूर्ख लोकांपासून दूर राहावे. मूर्ख लोकांची संगत कधीच चांगली नसते.
चाणक्य यांच्या मते, लोक फक्त वेळ वाया घालवतात. अनेक वेळा त्यांच्या चुकीच्या निर्णयाची शिक्षाही तुम्हाला भोगावी लागते.
आचार्य चाणक्या यांच्या मते, जर एखाद्या व्यक्तीला गोष्टींमध्ये दोष शोधण्याची किंवा रडण्याची सवय असेल तर त्याला लगेच सोडून द्या. त्यांच्यासोबत राहिल्याने वाईट परिणाम होतात.