आचार्य चाणक्य यांनी नीति शास्त्रामध्ये जीवनाशी संबंधित अशा तीन गोष्टी सांगितल्या आहेत ज्या कधीही कोणाला सांगू नयेत.
जरी ती व्यक्ती तुमच्या कितीही जवळची असली तर या गोष्टी त्यांना सांगू नका.
जर तुम्ही या गोष्टी त्यांना सांगितल्या तर त्यांना नेहमी काळजी वाटू लागते.
आचार्य चाणक्य म्हणतात की, जर एखाद्या व्यक्तीचे धनाशी संबंधित काही नुकसान झाले असेल तर त्याने हे कोणालाही सांगू नये.
चाणक्य म्हणतात की, कोणत्याही व्यक्तीने आपले दु: ख कधीच कुणासोबत शेअर करु नये. जर तुम्ही शेअर केले तर त्याची खिल्ली उडवू शकतात.
त्याचबरोबर जर एखाद्या व्यक्तीचा कुठेतरी अपमान झाला असेल तर त्याने त्याबद्दल कोणालाही सांगू नये. कारण आपल्या अपमानाबद्दल सांगण्याचा देखील नकारात्मक परिणाम होतो.