आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीति शास्त्रामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.
ज्याच्या मदतीने माणूस जीवनातील कोणत्याही कार्यात यशस्वी होऊ शकतो.
चाणक्य यांच्या मते, जो माणूस गोड बोलतो तो समाजातील सर्व लोकांना आनंद देतो.
यशस्वी होण्यासाठी व्यक्तीने आपल्या भाषणात अमृताची गोडी मिसळल्यानंतरच बोलावे.
आचार्य चाणक्य यांच्या मते, गोड बोलणारी आणि प्रेमाने वागणारी व्यक्ती प्रत्येकाला आपलेसे करते.
जो व्यक्ती नेहमी गोड बोलतो त्यांचा शत्रू नसतो. त्या व्यक्तीचा लोक नेहमी आदर करतात.