रेग्यूलर टोमॅटोच्या चटणीत कैरी घातल्यास एकमद भन्नाट टेस्ट येते. ही चटणी बनवण्याची रेसिपी एकदम सोपी आहे
चार ते पाच टोमॅटो आणि एक मध्यम आकाराची कैरी स्वच्छ धुऊन घ्या.
टोमॅटो आणि कैरीचे बारीक बारीक तुकडे करुन थोडस तेल टाकून एका पॅनमध्ये हलक्या आचेवर परचून घ्यावे.
लसणाच्या चार-पाच पाकळ्या थोडसं किसलेलं ओलं खोबरं दोन-चार हिरव्या मिरच्या चवीनुसार मीठ एवढे साहित्य लागणार आहे.
टोमॅटो आणि कैरीसह लसून पाकळ्या, मिरच्या किसलेलं ओलं खोबरं सर्व मिश्रण एकत्र मिक्सरमध्ये वाटून घ्या. यात थोडसं मीठ घाला.
टोमॅटो कैरीची चटपटीत चटणी तयार आहे. अवघ्या पाच ते दहा मिनिटांत ही चटणी तयार होते.
व्यवस्थित हवा बंद डब्यात भरुन ठेवल्यास ही चटणी तीन ते चार दिवस टिकते.