खोबरेल तेल हे केस आणि त्वचेसाठी खूप चांगले मानले जाते. खोबरेल तेल त्वचेवर लावल्यास त्वचा निरोगी राहण्यास मदत होते.
खोबरेल तेलात अनेक पोषक घटक असतात जे त्वचेला निरोगी ठेवण्याचे काम करतात आणि बॅक्टेरियापासून त्वचेचं संरक्षण करतात.
खोबरेल तेलात भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात, जे सूर्यकिरणांपासून त्वचेचे संरक्षण करतात.
चेहऱ्यावर पिंपल्स येत असतील तर त्वचेवर खोबरेल तेल लावल्याने ही समस्या दूर होते. खोबरेल तेलात अँटीफंगल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात.
त्वचा खूप कोरडी पडत असेल तर त्वचेवर खोबरेल तेल लावल्याने ही समस्या दूर होऊ शकते.
खोबरेल तेल त्वचेवर लावल्याने वृद्धत्वाची गती कमी होऊ शकते.
खोबरेल तेल त्वचेच्या छिद्रांना ब्लॉक करू शकते, ज्यामुळे ब्लॅकहेड्सची समस्या उद्भवू होऊ शकते. त्यामुळे त्वचेची योग्य स्वच्छता राखणे गरजेचे आहे.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. कोणताही पदार्थ त्वचेवर लावण्यापूर्वी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)