ऑक्टोबर महिना सुरू झाला असून अनेक ठिकाणी थंडीनेही दार ठोठावले आहे.
हलक्या थंडीची चाहूल लागताच लोकांनी एसी चालवणेही बंद केले आहे.
अनेकांनी थंड पाणी पिणेही बंद केले आहे. कारण या सिजनध्ये सर्दी-खोकल्याचा धोका वाढतो.
कोणताही ऋतू असू भाजीपाला ठेवण्यासाठी किंवा अन्य कोणत्याही गोष्टी ठेवण्यासाठी लोक फ्रीज वापरतात.
अशा स्थितीत हिवाळ्यात कोणत्या टेम्परेचरवर फ्रिज चालवावा असा प्रश्न पडतो.
हिवाळा येताच रेफ्रिजरेटरमध्ये बर्फ जमा होऊ लागतो. अशा परिस्थितीत फ्रिज कमी टेम्परेचरवर चालवणे चांगले.
हिवाळ्यात फ्रीजचा जास्त वापर केला जात नाही, अशा परिस्थितीत तुम्ही रेफ्रिजरेटर 2 डिग्री ते 5 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरवर चालवू शकता.