पुरुषांनो! रोज 1 विड्याचं पान खाण्याचे फायदे माहितीयेत का?


आयुर्वेद, चरक संहिता, सुश्रुत संहिता इत्यादींमध्ये विड्याच्या पानांना अतिशय आरोग्यदायी मानण्यात आले आहे. दररोज एक विड्याचं पान खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात.


अधिकतर रात्री जेवल्यानंतर पान खाण्याचा सल्ला दिला जातो. कारण यामुळे पचनक्रिया चांगली राहते आणि शरीराला अन्न पचवण्यास मदत मिळते.


विड्याचं पान हे पोट दुखी, जळजळ, या समस्यांवर सुद्धा लाभदायक ठरते. अनेक देशांमध्ये माऊथ फ्रेशनर म्हणूनही विड्याच्या पानाचे सेवन केले जाते.


लग्न झालेल्या पुरुषांसाठी सुद्धा विड्याचे पान फायदेशीर ठरते. पानामुळे पुरुषांची लैंगिक शक्ती वाढते. विड्याचं पान लैंगिक स्वास्थ्यासाठी उपयोगी ठरतं.


विड्याचं पान खाल्ल्याने टेस्टोस्टेरॉन हार्मोनची पातळी सुद्धा वाढते. ज्यामुळे पुरुषांची लैंगिक शक्ती वाढण्यास मदत मिळते.


पानामध्ये अँटी सेप्टिक आणि अँटी फंगल गुणधर्म असतात, ज्यामुळे फंगल इंफेक्शनपासून संरक्षण मिळते. तेव्हा इंफेक्शन झालेल्या ठिकाणी तुम्ही पानांची पेस्ट करून लावू शकता.


विड्याच्या पानांची पेस्ट जर सांधेदुखीवर प्रभावी ठरते. तुम्ही पानांची पेस्ट प्रभावित जागी लावू शकता.


(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

VIEW ALL

Read Next Story