काळं मीठ किंवा सैंधव मीठ हे बऱ्याचदा जेवणात आणि सलाडमध्ये वापरलं जातं. पण तुम्हाला काळ्या मिठाचे दुष्परिणाम माहितेय का ?
काळ्या मीठाच्या अतिसेवनामुळे थायरॉईडचा त्रास होण्याची शक्यता जास्त असते. जर तुम्हाला थायरॉईडची समस्या असेल तर काळ्या मीठाचं सेवन करणं टाळावं.
काळं मीठ रक्त पातळ करतं. जर तुम्हाला उच्च रक्तदाबाचा त्रास असेल तर काळ्या मीठाचं सेवन करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
काळ्या मिठाचं प्रमाण आहारात जास्त झाल्यास किडनीसंबंधीत आजार होण्याची शक्यता असते.
काळ्या मिठाच्या अतिसेवनाने उल़टी आणि मळमळ होते.
काळं मीठ आहारात अतिप्रमाणात वापरल्यास हृदयविकाराचा त्रास होऊ शकतो.
(वरील माहिती सर्वसामान्य संदर्भांवर आधारित असून, आरोग्यविषयक निर्णयांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.)