पती-पत्नीमधील नाते हे खूप मौल्यवान असतं. पती पत्नी एकमेकांना सर्व गोष्टी सांगतात.
सुखी वैवाहिक जीवनासाठी चाणक्य नीतिनुसार पतीने पत्नीबद्दल कुठल्या गोष्टी मित्रांना सांगू नये हे सांगितलंय.
सुखी वैवाहिक जीवनात मीठा खडा पडू नये म्हणून पतीने या गोष्टी लक्षात ठेवाव्यात.
पतीने पत्नीबद्दल घराबाहेरील कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीकडे कधीही तक्रार करू नये. असं केल्याने व्यक्तीचा स्वाभिमान तर कमी होतोच पण नात्यातही अंतर निर्माण होण्याची शक्यता असते. याशिवाय पत्नी इतरांसमोर वाईट ठरू शकते.
पतीने इतरांसमोर आपल्या असहायतेबद्दल कधीही रडू नये. असं केल्यास समोरची व्यक्ती तुमचा फायदा घेऊ शकते. त्याच वेळी, तुम्ही इतरांसमोर हसण्याचे पात्र देखील बनू शकता.
एखाद्या मूर्ख व्यक्तीने तुमचा अपमान केला असेल किंवा तुमचा सन्मान दुखावला गेला असले तर हे कधीही तिसऱ्या व्यक्तीला सांगू नका. हे विसरुन मूर्खांनी केलेला अपमान कोणाच्याही लायकीचा नसतो हे लक्षात ठेवा.