चाणक्यनीती नुसार 'या' प्रसंगी सोडूनच द्या लाज-लज्जा

Jun 06,2024

आचार्य चाणक्य यांच्या नितींचे पालन

आचार्य चाणक्य यांच्या नितींचे पालन केल्यास लोक सुखी तर होणारच पण समाजात मान-सन्मान मिळेल. नीतिशास्त्राचे विद्वान आचार्य चाणक्य यांनी सांगितलेले विचार आत्मसात केले तर आयुष्य सुखी होईल

आयुष्यात पुढे जाण्यासाठी काय करावे

आचार्य चाणक्य यांनी सांगितले आहे की एखाद्या व्यक्तीला आयुष्यात पुढे जाण्यासाठी काय करावे व काय नाही

लाज सोडावी

त्यांनी त्यांच्या चाणक्य नितीत म्हटलं आहे की, व्यक्तीला कोणत्या ठिकाणी आपली लाज सोडावी लागते.

यश

जर एखादा व्यक्ती काही ठिकाणी लाजत बसेल तर त्याला यश कधीच मिळत नाही. कोणत्या ठिकाणी व्यक्तीने लाज-लज्जा सोडली पाहिजे, हे चाणक्यने सांगितले आहे.

धन-संपत्ती

चाणक्य म्हणतात, जर तुमच्याकडे धन-संपत्ती नसेल तर ती कमवण्यासाठी तुम्हाला पडेल ते काम करावे लागले. अशावेळी शरम व लाज लज्जा सोडावी

ज्ञान

जर कुठे तुम्हाला ज्ञान मिळत असेल तर ते ज्ञान मिळवण्यासाठी तुम्हा कोणताही विचार न करता ज्ञान मिळवावे

भोजन

जर तुम्ही कुठे भोजन करत असाल तर निसंकोचपणे पोटभरुन जेवण करा. भोजन करताना कोणतीही लाज-लज्जा बाळगू नका

मान-सन्मान

कोणत्याही मोठ्या व्यक्तीचा मान-सन्मान करताना कोणत्याही प्रकारची लाज बाळगू नये. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story