कपडे धुताना अनेकदा गडद रंग फिकट होतात. ही एक सामान्य गोष्ट आहे.कपडे जर व्यवस्थित धुतले जर त्यांचा रंग बराच काळ सुरक्षित राहू शकतो.
जर तुम्हालासुद्धा तुमच्या कपड्यांचा रंग टिकवून ठेवायचा असेल तर या ट्रिक्स नक्की वापरा.
कपडे धुवताना तापमान लक्षात ठेवणं फार गरजेच असतं. जास्त गरम पाण्यात कपडे धुतल्याने कपड्यांचा रंग फिका होता तर थंड पाणी रंग टिकवून ठेवण्यास मदत करतात.
रंगीत कपड्यांसाठी सौम्य डिटर्जंटचा वापर करावा.डिटर्जंट जास्त वापरल्याने देखील कपडे फिके होऊ शकतात.
कपडे धुवताना ते हळूवार धुतले पाहिजेत. जास्त घासून धुतले तर कपड्यांच्या रंगावर परिणाम होऊ शकतो.
मीठ हे नैसर्गिकपणे रंगाचे संरक्षण करते.रंगीत कपडे धुण्याआधी पाण्यात एक चमचा मीठ टाकल्याने कपड्यांचा रंग टिकून राहण्यास मदत होते.
कडक सुर्यप्रकाशात कपडे सुकवल्याने रंग फिका होऊ शकतो. गडद रंगाचे कपडे सुकवण्यासाठी सावलीचा वापर करा यामुळे रंग खराब होत नाहीत.