दैनंदिन जीवनातील ताणतणावापासून मुक्त होण्यासाठी आपल्याला दररोज काही विशिष्ट पदार्थ खाण्याची सवय लावणे आवश्यक आहे, जे तणाव कमी करतात.
तुळस आरोग्यास अनेक प्रकारे मदत करते. तुळशीमध्ये अॅडाप्टोजेन भरपूर प्रमाणात असते. यामुळे शरीरातील तणावाची पातळी कमी होण्यास मदत होते.
अंड्यात प्रथिने भरपूर प्रमाणात असतात. अंड्यातील कोलीनचा मेंदूवर चांगला परिणाम होतो. दररोज एक अंडे खाल्ल्याने शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या अनेक फायदे मिळतात.
भोपळ्याच्या बिया खाल्ल्याने शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स संतुलित होण्यास मदत होते. ताण कमी करण्यासाठी भोपळ्याच्या बिया खाणे आवश्यक आहे.
डार्क चॉकलेटचा एक छोटा तुकडा रोज खाणे आवश्यक आहे. यामुळे तणाव चिंता कमी होते.
हळदीमध्ये कर्क्युमिन नावाचे कंपाऊंड असते, जे चिंता कमी करते आणि मानसिक विकार आणि नैराश्य टाळते.
सॅल्मन माशामध्ये ओमेगा 3 फॅटी अॅसिड भरपूर प्रमाणात असते. सार्डिन आणि ट्यूना सारख्या माशांमध्ये ओमेगा 3 फॅटी अॅसिड देखील भरपूर असतात.