वेडिंग आणि मॅरिज हे दोन्ही इंग्रजीतील शब्द सहसा लग्नाचा दिवस, लग्नाची वर्षपूर्वी यासाठी वापरले जातात.
लग्न... म्हणजे एक नवा प्रवास. दोन व्यक्तींन नात्याला दिलेलं एक नवं नाव, नवी ओळख.
प्रत्येक व्यक्तीसाठी या शब्दाचं महत्त्वं तितकंच वेगळं. अशा या लग्नाला अनेकदा वेडिंग किंवा मॅरेज म्हणूनही संबोधलं जातं.
मॅरेजचा अर्थ असा, की हे दोन व्यक्तींमध्ये असणारं एक असं नात आहे जे आयुष्यभर निभावलं जाणं अपेक्षित असतं. विवाहसंस्थेतून तयार होणाऱ्या एका नव्या नात्याला मॅरेज म्हणतात.
वेडिंग शब्दाचा अर्थ होतो लग्नविधी, पूजा आणि प्रथा. एक अशी परंपरा जिथं वधूवरांना अनेकांच्या शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद मिळतात.
वेडिंग म्हणजे एक अशी विधी जिथं नातेवाईकांच्या साक्षीने विधी संपन्न होऊन सहजीवनाची सुरुवात केली जाते.