डेंग्यू आणि मलेरियामध्ये नेमका काय फरक असतो?


पावसाळ्यात अधिकतर डेंग्यू आणि मलेरियाच्या आजारांचा धोका वाढतो. हे दोन्ही आजार जरी डास चावल्याने होत असले तरी दोघांची लक्षणं वेगवेगळी आहेत.


डेंग्यू हा आजार संसर्गजन्य असून एडीस नावाचा डास चावल्याने होतो. तर हे डास चावल्यावर 4 ते 5 दिवसांनी याची लक्षण दिसू लागतात.


मलेरिया हा सुद्धा डासांच्या माध्यमातून पसरणारा आजार असून याची लागण मादी अनोफिलीज हे डास चावल्याने होते. डास चावल्यावर 10 ते 15 दिवसांनी याची लक्षण जाणवू लागतात.


मलेरिया झाल्यावर तीव्र डोकेदुखी, घसा खवखवणे, स्नायू दुखणे, अस्वस्थ वाटणे, थंडी वाजून ताप येणे, श्वास घेण्यात त्रास होणे, थकवा जाणवणे, सतत घाम येणे, मळमळ आणि उलट्या, ऍनिमिया आणि रक्तस्त्राव होणे इत्यादी लक्षण जाणवतात.


डेंग्यूची लागण झालयावर तीव्र ताप, डोकेदुखी, तीव्र संधीवात, मासपेशीच्या वेदना, तीव्र सांधेदुखी, मळमळ उलट्या, नाकातून आणि हिरड्यांमधून रक्त येणे, त्वचेवर लाल चट्टे उटणे, पोट दुखणे इत्यादी लक्षण जाणवतात.


डेंग्यूची गंभीर लक्षण दिसू लागल्यावर याचा थेट परिणाम हृदयावर होतो. यामध्ये व्यक्तीच्या हृदयाला सूज येते आणि न्यूमोनिया होण्याचा धोका असतो.


मलेरियाची गंभीर लक्षण दिसू लागल्यास व्यक्तीच्या किडनीवर आणि पांढऱ्या पेशींवर गंभीर परिणाम होऊ शकतो.


(येथे दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. संबंधित माहितीसाठी ZEE24Taas जबाबदार नसेल.)

VIEW ALL

Read Next Story