सोशल मीडियावरील मोटिव्हेशनल स्पीकर आणि दृष्ठी आयएएसचे संचालक डॉ. विकास दिव्यकीर्ति सध्या चर्चेत असतात.
विकास दिव्यकीर्ति अनेक तरुणांना आणि तरुणींना मार्गदर्शन करताना दिसतात. त्यामुळे अनेकजणांवर त्यांचा प्रभाव आहे.
करियर करण्याचं वय आणि प्रेमात पडण्याचं वय एकच असतं. त्यामुळे या दोन्ही गोष्टींमध्ये समतोल कसा राखायचा? यावर त्यांनी भाष्य केलंय.
करियर असो वा प्रेम... दोन्ही गोष्टींमध्ये फोकस महत्त्वाचा असतो. अशा मुलांना मी सांगतो की, काही दिवस तुम्ही फक्त प्रेम करा... जोडीदाराला वेळ द्या.
मला माहितीये की, तुम्हाला 20 ते 25 दिवसांनंतर वाटणार की काहीतरी दुसरं केलं पाहिजे. प्रत्येकाला असं कधी ना कधी वाटतंच.
जेव्हा प्रेमातून बाहेर पडाल, तेव्हा मनसोक्त अध्यास करा.. जर शरिरावर प्रेम केलं तर ते प्रेम 20 ते 25 दिवसांनंतर टिकणार नाही.
जर तुम्हाला असं प्रेम मिळालं ते तुम्हाला मुक्त करेल, तर तुम्ही अधिक जोर लावून अभ्यास कराल आणि मन लावून लक्ष केंद्रीत कराल, असं विकास दिव्यकीर्ति म्हणतात.