अनेकांना जेवताना भरपूर पाणी प्यायची सवय असते. तर काहीजण जेवताना अजिबात पाणी पिऊ नये असा सल्ला देतात. मात्र यामागचं नेमकं कारण काय आणि जेवताना पाणी प्यावं की नाही याबाबत महत्वाची माहिती जाणून घेऊयात.
तज्ज्ञांच्या मते पोटातील अन्न पचवण्यासाठी पोटात असलेले पाचकरस आणि ऍसिड्स आवश्यक असतात. मात्र जेवणादरम्यान भरपूर पाणी प्यायल्याने हे रस पातळ होतात आणि परिणामी अन्न पचण्यास उशीर होतो.
जेवताना पाणी प्यायल्याने ऍसिडिटीचा त्रास सुद्धा होऊ शकतो
जेवताना पाणी प्यायल्याने पोषकतत्वांचे पोषण कमी होते. यामुळे अशक्तपणा, थकवा अशा आरोग्याच्या समस्या निर्माण होतात.
जेवताना पाणी प्यायल्याने अन्नाचे नीट पचन होत नाही परिणामी त्याचे रूपांतर फॅट्समध्ये होते. शरीरात चरबी साठून राहते आणि वजन वाढते.
तज्ज्ञांच्या मते जर जेवताना तुम्हाला घास लागला किंवा अगदीच पाणी प्यावेसे वाटत असेल तर तुम्ही घोटभर पाणी पिऊ शकता. अन्यथा जेवताना पाणी पिऊ नये असा सल्ला तज्ज्ञ देतात.
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार जेवणापूर्वी अर्धातास अगोदर पाणी प्यावे. तसेच जेवल्यावर लगेच पाणी पिऊ नये. जेवण केल्यावर अर्धातासांनी घोट घोटभर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)