अनेकदा मासांहारी पदार्थ बनवल्यानंतर त्याचा वास हा संपूर्ण घरभर परसतो. भांडी घासल्यानंतरही तो वास कायम पाहायला मिळतो.

Apr 06,2024


मग अशावेळी काय करायचे असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो.


हा वास घालवण्यासाठी आपण सुगंधी स्प्रे, रूम फ्रेशनरचा वापर करतो. पण काही घरगुती उपाय करुनही तुम्ही हा वास घालवू शकता.


जर तुम्हाला भांड्यांना येणारा मच्छीचा वास घालवायचा असेल तर लिंबू हा फार फायदेशीर ठरतो. यासाठी तुम्ही लिंबाची साल भांड्यावर घासा आणि 20 मिनिटे ते भांडे तसेच ठेवा. त्यानंतर ते धुवून टाका.


जर तुमच्या घरात मच्छीचा वास परसला असेल तर तुम्ही कापूर वापरुन तो घालवू शकता. जर घरात किंवा स्वयंपाकघरात मच्छीचा वास येत असेल तर एक-दोन कापराच्या वड्या जाळा.


भांड्यांना किंवा घरात मच्छीचा वास येत असेल तर व्हिनेगर हे फारच उपयुक्त ठरते. ज्या भांड्यात तुम्हाला मच्छीचा वास येतोय ते भांडे घासून त्यात व्हिनेगर घालून थोडा वेळ ठेवा. त्यानंतर ते धुवून टाका.


तसेच घरात मच्छीचा वास येत असेल तर एका भांड्यात पाणी आणि व्हिनेगर घाला आणि ते पाणी उकळवा. यामुळे घरातील वास नाहीसा होण्यास मदत होते.


मच्छीचा वास लवकरात लवकर घालवण्यासाठी तुम्ही घराचे दारे, खिडक्या किंवा बाल्कनीचे दरवाजे उघडून ठेवा. त्यामुळे घरातील हवा खेळती राहून वास जाण्यास मदत होईल.

VIEW ALL

Read Next Story