सकाळी नाश्त्याला चहा चपाती खाताय? वेळीच व्हा सावध


सकाळी उठल्यानंतर आज नाश्ता काय करायचा असा प्रश्न पडतो. मग अनेक घरांमध्ये चहा चपातीचा नाश्ता केला जातो.


तुम्हालाही वाटतं का चहा आणि चपाती हा अत्यंत हेल्दी नाश्ता आहे? पण असं अजिबात नाही.


दिवसाची सुरूवात हेल्दी नाश्त्याने करावी असं तज्ज्ञांकडूनही सांगितलं जातं. आणि चहा-चपाती हा विरूद्ध आहार आहे.


यातून फारच कमी पोषण मिळते आणि उपाशीपोटी हा नाश्ता केल्याने शरीरालाही त्रास होतो.


आपण रात्रभराच्या ७-८ तासाच्या झोपेनंतर नाश्ता करतो. त्यामुळे दिवसभर शरीराला लागणारी उर्जा नाश्त्यातून मिळायला हवी.


चहामध्ये कॅफिन असते आणि उपाशीपोटी दुधाचा चहा पिऊन दिवसाची सुरूवात करणे योग्य नाही


चहासोबत पोळी पराठे अशा पदार्थांचे सेवन केल्याने पोटात सूज येऊन तुमच्या पोटीतील संतुलन बिघडू शकते.


चहामध्ये टॅनिन असते, जे शरीरामध्ये अँटीन्यूट्रिअंट्स म्हणून काम करते. टॅनिन हे प्रोटीन्सचे पचन साधारण ३८% कमी करते. त्यामुळे पोटाला त्रास होतो


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story