केसांच्या उत्तमवाढीसाठी 'हे' अंड्याचं हेअर मास्क करा ट्राय..!

Feb 20,2024


आजकाल केस गळणे, कोरडे किंवा निस्तेज केस या समस्या आपल्यासाठी कधीही न संपणाऱ्या आहेत. प्रदूषण, धूळ-माती, सूर्याची हानिकारक किरणे आणि हेअर स्टाइलिंग टूल्सचा जास्त वापर केल्यामुळे केसांची निरोगी चमक नष्ट होते आणि त्यामुळे केस निस्तेज आणि कोरडे दिसतात.


कोरडे केस तुटण्याची अधिक शक्यता असते. केसांच्या आरोग्यासाठी त्यात अंडे लावण्याची परंपरा खूप जुनी आहे. अंड्यात भरपूर प्रमाणात प्रोटीन, व्हिटॅमिन आणि मिनरल्स असतात, जे आपल्या आरोग्यासोबतच केसांच्या आणि त्वचेच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात.


अंड आपल्या केसांना नैसर्गिक पद्धतीनं मॉइश्चराईज करतं आणि केसांना हेल्दी ठेवतं. अंड्यामध्ये अंड्यामध्ये व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन के, थायमिन, रिबोफ्लेविन, नियासिन, व्हिटॅमिन बी6, व्हिटॅमिन बी12, फोलेट इत्यादी अनेक आवश्यक जीवनसत्त्वे असतात.


अंड्याचे हेअर मास्क केस गळणे टाळण्यास आणि कुरळे केस कमी करण्यास मदत करतात. अंड्यांमधील प्रथिने केसांच्या स्काल्पला मजबूत करण्यास मदत करतात. सल्फर केसांच्या वाढीस उत्तेजन देते आणि केस गळणे कमी करते.


अंड्यामुळे केसांचं तुटणं थांबवतं आणि केसांना मूळापासून कंडिशनिंग करतं त्यासोबतच केसांची चांगली आणि झपाट्यानं वाढ होते. अंड्याचं मास्क केसांशी निगडित सर्व समस्यांना मूळापासून संपवतं आणि केस बळकट होतात.


अंड्यामध्ये थोडेसे ताजे कोरफडीचे जेल मिसळून तुम्ही केसांना लावू शकता. कोरफ केसांसाठी खूप फायदेशीर मानलं जातं. कोरफड जेलमधील अँटीइन्फ्लेमेटरी, अँटिसेप्टिक आणि मॉईस्चराईजिंग गुण स्काल्पला निरोगी राखतात. यामुळे केस अधिक निरोगी राहतात आणि लवकर वाढण्यास मदत मिळते.


ऑलिव्ह ऑईल आणि अंड्याच्या पिवळ्या भागाचे हे मिश्रण केसांसाठी योग्य कंडिशनर म्हणून वापरता येते. हे तुमच्या केसांना मुलायम आणि चमकदार बनवण्यासाठी उपयुक्त ठरते.


नारळ तेलामध्ये भरपूर प्रमाणात फॅटी अॅसिड आढळते, जे केसांना कंडिशन करते आणि केसांना तुटण्यापासून आणि कोरडे होण्यापासून वाचवते. यामध्ये अँटीबॅक्टेरियल गुणही आढळतात. जे तुमच्या स्काल्पला अधिक निरोगी बनवण्यासाठी उपयुक्त ठरते. तसंच यातील विटामिन हे मुळापासून पोषण देऊन केसांना अधिक मजबूत करतात.

VIEW ALL

Read Next Story