कडक उन आणि उष्ण हवेचा डोळ्यांना त्रास होतो. त्यामुळे डोळ्यामधील उष्णता वाढून डोळे कोरडे होतात.
डोळ्यांना ऍलर्जी होते, डोळे लाल होतात , डोळ्यांतून पाणी येत, डोळे सूजतात आणि जळजळ होते.
कडक उन्हापासून डोळ्यांना वाचवणं खूप गरजेचं आहे.
डोळ्यांना सतत हात लावणं टाळा. आणि त्यांना वेळोवेळी स्वच्छ पाण्यानं धुवा.
सुर्याच्या कडक किरणांपासून डोळ्यांना वाचवण्यासाठी सनग्लासेसचा वापर करावा.
डोळ्यांना निरोगी ठेवण्यासाठी विटॅमिन सी असलेल्या फळांचं सेवन करा.
लालपणा आणि सूज कमी करण्यासाठी बर्फानं डोळ्यांना शेक द्या.
काकडी कापून डोळ्यांना लावा, यामुळे डोळे थंड राहतात.