सर्व माणसांचे अवयव एक सारखे असले तरी त्यांचा आकार, रंग, उंची ही वेगवेगळी असते.
तुम्हाला माहितीये का? की माणसांच्या पायांच्या बोटांवरून व्यक्तीचा स्वभाव ओळखता येतो.
ज्या व्यक्तींच्या पायाची बोटं ही जाड असतात असे लोक त्यांच्या आवडत्या लोकांवर खूप प्रेम करतात. त्यांना आपल्या लोकांची काळजी असते आणि त्यांना नेहमी खुश ठेवण्याचा प्रयत्न करतात.
ज्या लोकांच्या पायांची बोटं ही बारीक असतात अशा लोकांना त्यांच्या मर्जीने जीवन जगायला आवडते. असे लोक स्वतःवर खूप खर्च करतात पण जेव्हा दुसऱ्यांची गोष्ट येते तेव्हा ते हात आखडता घेतात.
काही लोकांच्या पायांचा अंगठा हा लांब असतो. ज्या लोकांच्या पायांचा अंगठा आणि त्याच्या बाजूचे बोट हे सारख्या उंचीचे असते असे लोक रुबाबदार असतात. ते त्यांचा मुद्दा मांडण्यास सक्षम असतात आणि त्यांनी जे ठरवलं आहे तेच करतात.
केवळ बोटांचा आकार नाही तर त्यांच्यातील अंतर सुद्धा माणसांच्या व्यक्तिमत्वाविषयी खूप काही सांगून जाते.
ज्या लोकांच्या पायातील बोटात खूप जास्त गॅप असतो असतो अशी लोक स्वभावाने स्वार्थी असतात. असे लोक नेहमी दिखावा करतात आणि कमी संवेदनशील असतात.
ज्या लोकांच्या पायांच्या बोटांमध्ये खूप जास्त अंतर नसते असे लोक खूप प्रामाणिक असतात. अशा व्यक्तींना खूप जास्त मित्र बनवणं आवडत नाही. ते खूप कमी लोकांसोबत वेळ घालवण्यात आनंद मानतात. पण अशी लोक आयुष्यभर मैत्री जपतात.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)