आपल्याला सर्वांनाच माहित आहे जपानी लोक त्यांच्या सुंदरतेसाठी आणि दीर्घायुष्यासाठी जगभर ओळखले जातात.
त्याच बरोबर जपानी लोक त्यांच्या तरूण आणि सुंदर त्वचेसाठी देखील जगभर ओळखले जातात.
जपानी लोक त्यांच्या आहार संतुलित ठेवतात ज्यामुळे ते वयाच्या 50व्या वर्षीदेखील तरूण दिसतात.
तुम्हीसुद्धा जाणून घ्या जपानी लोकांचा आहार ज्यामुळे ते नेहमी निरोगी राहतात
जपानी लोक त्यांच्या आहारात भरपूर प्रमाणात माशांचा समावेश करतात. माशांमध्ये व्हिटॅमिन ई चे प्रमाण अधिक असते जे त्वचा तरूण ठेवण्यासाठी मदत करतात.
जपानी लोक तरूण दिसण्यासाठी ग्रीन टीचं सेवन अधिक करतात.
जपानी लोक रोज योगा आणि शारीरिक हालचाली जास्त करतात ज्यामुळे त्यांना तरूण दिसण्यासाठी मदत होते.
तसेच त्वचेला तरूण ठेवण्यासाठी त्वचेची योग्य काळजी घेणे फार गरजेचे असते.
जर तुम्हालासुद्धा तुमची त्वचा आणि स्वत:ला निरोगी ठेवायचे असेल तर ताणतणावापासून दूर राहिलं पाहिजे. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)