फ्लॉवरची तीच तीच भाजी खावून कंटाळला असाल तर आज आम्ही तुम्हाला एक हटके रेसिपी सांगणार आहोत
फ्लॉवरची भाजी करण्याऐवजी कधी तरी फ्लोवरचे लॉलीपॉप करुन पाहा. याची रेसिपी पाहा
फ्लॉवर, रेड चिली सॉस, शेजवान सॉस, सोया सॉस, चिली सॉस, कॉर्नफ्लॉवर, मैदा, मीठ, आले-लसूण पेस्ट
सर्वप्रथम फ्लॉवर नीट साफ करुन फ्लॉवर देढासकट काढून घ्या. जेणेकरुन ते लॉलीपॉपसारखे वाटतील
त्यानंतर एका भांड्यात रेड चिली सॉस, ग्रीन चिली सॉस, मिरची पावडर, सोया सॉस, शेजवान सॉस, आले लसूण पेस्ट, मीठ हे सर्व मसाले एकत्र करुन घ्या.
मसाला तयार झाला की त्यात फ्लॉवरचे तुकडे टाका व 10 ते 15 मिनिटे मॅरिनेट होईपर्यंत ठेवा.
10 मिनिटांनंतर त्यात मैदा आणि कॉर्नफ्लॉवर टाकून सर्व मिश्रण एकजीव करुन घ्या.
तेल गरम झाल्यानंतर त्यात एक एक करुन लॉलीपॉप तळून घ्या. लॉलीपॉपला छान लाल रंग येईपर्यंत तळून घ्या
आता खाण्यासाठी हे फ्लॉवरचे लॉलीपॉप तयार आहेत. शेजवान चटणी किंवा सॉससोबत छान लागतात.