अंड्यातील पिवळ्या भागात कोणते व्हिटॅमिन असतात?


अंड्यातील पिवळा भाग हा पोषकतत्त्वांनी परिपूर्ण आहे. त्यामुळे ते आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतं.


अंड्यातील पिवळ्या भागात कॅल्शियम, मॅग्नेशियम, आयर्न, फॉस्फरस, प्रोटीन, झिंक, फॉलेट आणि सॅलेनियम असतात.


या पिवळ्या भागात व्हिटॅमिन ए, डी, के आणि बी12 असतात. हे सगळे व्हिटॅमिन आरोग्यासाठी चांगले आहेत. जाणून घेऊया यामुळे आपल्या शरीराला नक्की कोणते फायदे होतात.

व्हिटॅमिन ए

अंड्याच्या पिवळ्या भागातून मिळणारं 'व्हिटॅमिन ए' आपल्या डोळ्यांची दृष्टी सुधारण्यात मदत करतं. त्याचबरोबर आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवतं.

व्हिटॅमिन डी

'व्हिटॅमिन डी' युक्त अंड्याचं सेवन केल्यास हाडं आणि स्नायू मजबूत होतात आणि आपला मूडही सुधारतो.

व्हिटॅमिन के

अंड्याच्या पिवळ्या भागात असणारं 'व्हिटॅमिन के' शरीरावरील जखमा लवकर बऱ्या होण्यास मदत करतं. याशिवाय हृदयाचं आरोग्यही चांगलं राहतं.

व्हिटॅमिन बी12

महत्त्वाचं म्हणजे 'व्हिटॅमिन बी12' आपल्या शरीरात रेड ब्लड सेल्स तयार करतं. याशिवाय बी12 मुळे आपली विचार करण्याची, समजण्याची क्षमतीही वाढते.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story