शरीरात जेव्हा इन्सुलिन हॉर्मोन योग्यप्रकारे कार्य करत नाही तेव्हा मधुमेहाची समस्या निर्माण होते. ज्यामुळे शरीरातील ब्लड शुगर लेव्हल वाढते.
डायबिटीजच्या रुग्णांनी अतिप्रमाणात गोड पदार्थ टाळण्याचा सल्ला दिला जातो. गोड पदार्थ खाल्ल्याने ब्लड शुगर लेव्हल वाढू शकते. पण मधुमेहाचे रुग्ण हे गोड पदार्थ खावू शकतात.
डॉ अजय कुमार म्हणतात, की डायबिटीजचे रुग्ण खजूर खाऊ शकतात. हे चवीला गोड असतात आणि ब्लड शुगर लेव्हलही नियंत्रणात ठेवतात.
डॉ कुमार म्हणतात, की संत्री डायबिटीजच्या रुग्णांच्या आरोग्यांसाठी उपयुक्त फळ आहे. यात विटॅमिन सी असतं जे शरीरातील ब्लड शुगर लेव्हल वाढू देत नाही.
डायबिटीजचे रुग्ण डार्क चॉकलेट खाऊ शकतात. यात अॅंटीऑक्सीडंट असतात. यामुळं ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात राहते.
सफरचंदामध्ये जास्त प्रमाणात फायबर असतं. डायबिटीजच्या रुग्णांनी आपल्या आहारात याचा सामावेश केला पाहीजे. हे ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात ठेवते.
बेरीमध्ये अॅंटीऑक्सीडंट भरपूर प्रमाणात असतं. यामुळं ब्लड शुगर लेव्हल वाढत नाही. तुम्ही ब्लूबेरी आणि स्ट्रॉबेरीचे सेवन करु शकता.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)