अनेकजण जेवणात गव्हाच्या पीठाची चपाती/पोळी खाणं पसंत करतात. भात, डाळ, भाजी, चपाती या पदार्थांचा जेवणात कायमच समावेश असतो.

Jan 27,2024


अनेकदा गव्हाच्या पिठाची चपाती खाऊन प्रचंड कंटाळा येतो. अनेकांना वजन कमी करायचे असेल तर गव्हाच्या चपाती कमी खाण्याचा सल्ला दिला जातो.


त्यामुळे अशावेळी मैद्याची रोटी किंवा नान खाण्यापेक्षा तुम्ही पौष्टिक पिठाच्या चपाती किंवा भाकरी खाण्याचा पर्याय निवडू शकता.

नाचणी

नाचणीचे पीठ हे शरीरासाठी उपयुक्त मानले जाते. यात मोठ्या प्रमाणात कॅल्शिअम, प्रोटीन, फायबरचा समावेश असतो. नाचणीचे पीठ ग्लूटन फ्री असते. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

बाजरी

बाजरीच्या पीठाची भाकरी ही शरीरासाठी चांगली असते. यामुळे तुमच्या रक्तातील साखर नियंत्रणास राहण्यास मदत होते.

ज्वारी

ज्वारीच्या भाकरीत मोठ्या प्रमाणात फायबर आणि प्रोटीन्सचा समावेश असतो. ज्वारीच्या भाकरीचे पचन लवकर होते. तसेच तुम्हाला वारंवार भूक लागण्याची समस्याही दूर होते.

मका

मक्याची रोटी खाण्याचे अनेक फायदे असतात. यात मुबलक प्रमाणात फायबर असते. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

ओट्स

ओट्समध्ये मुबलक प्रमाणात बीटा ग्लूकनही असते. यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. तसेच शुगर लेवल नियंत्रणात राहते.

राजगिरा

राजगिऱ्याच्या पीठात प्रोटीन, फायबर, मॅग्नेशियम, फॉस्फरस भरपूर प्रमाणात असते. राजगिराच्या पिठाची भाकरी ही वजन कमी करण्यासाठी फायदेशीर असते.

VIEW ALL

Read Next Story