कोबीची भाजी म्हटलं की लहान मुलं नाक मुरडतात.
कोबीपासूनच आज आम्ही तुम्हाला एक हटके पदार्थ सांगणार आहोत.
कोबीचे भानोळे हा एक पारंपारिक पदार्थ आहे. त्याची रेसिपी आज तुम्हाला सांगणार आहोत
कोबी बारीक चिरलेला, कांदे, बेसन, तांदळाचे पीठ, गुळ चवीपुरता, मसाला, हळद, धणे पावडर, हिंग, तेल, मीठ आणि पाणी आवश्यकतेनुसार
बारीक चिरलेल्या कोबीमध्ये कांदे, बेसन, तांदळाचे पीठ, गुळ, मसाला, हळद, धणे पावडर, हिंग पाणी आणि पाणी टाकून एकजीव करुन घ्या.
त्यानंतर एका पॅनला तेलाचा हात लावून वरील मिश्रण त्यात पसरवून घ्या. हे सर्व मिश्रण 10 ते 15 मिनिटे हे मंद आचेवर शिजत ठेवा.
भानोळ्याची एक बाजू शिजल्यानंतर ते केकप्रमाणे ताटात काढून घ्या. नंतर पुन्हा पॅनला तेल लावून दुसरी बाजू पॅनमध्ये ठेवा
भानोळे गॅसवर मंद आचेवर खरपूस भाजून घ्या. दोन्ही बाजू व्यवस्थित शिजवून घ्या.
आता तुमचे कोबीचे भानोळे खाण्यसाठी तयार आहे.