क्रेडिट कार्डवर वर्षाला 30 ते 48 टक्के व्याज आकारलं जातं.
वेळेत बिलाचे पैसे भरले नाही तर बँक वापरलेल्या पैशावर जास्त व्याज आकारतात.
क्रेडिड कार्डवरुन ग्राहकांनी खरेदी केल्यावर बँका मर्चेंटकडून 2 ते 3 टक्के फी घेतात.
बँका ब्रॅण्ड्सबरोबर करार करुन मार्केटींगच्या माध्यमातून शुल्क आकारुन बरीच कमाई करतात.
रोख रक्कम काढल्यानंतर बँका 2.5 ते 3 टक्के फी आकारतात.
क्रेडिट कार्ड सक्रीय ठेवण्यासाठी बँका ग्राहकांकडून वार्षिक शुल्क घेतात.
वेळेत पैसे भरले नाही तर बँका ग्राहकांकडून लेट चार्जच्या नावाखाली दंड वसूल करतात.
एका क्रेडिट कार्डवरुन दुसऱ्या क्रेडिट कार्डवर लोन ट्रान्सफर केलं तर 3 ते 5 टक्के फी आकारली जाते.
परदेशामध्ये क्रेडिट कार्ड वापरण्यासाठी बँका अतिरिक्त शुल्क आकारतात.