कामानिमित्त आपण तासंतास एका जागेवर बसून असतो. त्यासाठी निरोगी राहण्यासाठी आपण दररोज चालले पाहिजे असं आरोग्य तज्ज्ञ सांगतात.
दररोज आणि नियमित चालल्याने हृदयाचे आरोग्य आणि अनेक आजारांपासून आपला बचाव होतो, असं तज्ज्ञ सांगतात.
एक किलोमीटर चालल्याने नेमकं किती कॅलरीज बर्न होतात, असा प्रश्न वारंवार अनेकांना पडतो.
आरोग्य तज्ज्ञांनुसार कॅलरीज बर्न होणे हे तुमच्या वजनावर अवलंबून असते. जर तुमचं वजन जास्त असेल तर जास्त कॅलरीज बर्न होतात.
त्याशिवाय किती आणि कोणत्या वेगाने तुम्ही चालतात यावरही कॅलरीज बर्न होण्याच प्रमाण ठरतं.
जर तुमचं वजन 90 किलो असेल आणि तुम्ही एक किलोमीटर चालत असाल तर 80-100 कॅलरीज बर्न होतात.
तुमचं वजन 70 किलो किंवा त्याचा जवळपास असेल तर एक किलोमीटर चालल्याने 60 - 75 कॅलरीज बर्न करता. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)