बरेच लोक दिवसातून फक्त 3 वेळा जेवण करतात. दिवसातून तीन वेळा जेवण करणे हे आरोग्यासाठी चांगले आहे. ज्यामुळे अन्नाचे पचन व्यवस्थित होते.
निरोगी व्यक्तीने सकाळ, दुपार आणि रात्री असं तीन वेळा खाणं योग्य मानलं जातं.
दुसरीकडे, सामान्य व्यक्तीच्या तुलनेत, ज्यांचं वजन सामान्यपेक्षा कमी आहे किंवा ज्यांना कोणत्याही शारीरिक समस्या आहेत त्यांनी दिवसातून चार वेळा जेवण करणं चांगलं आहे.
धुमेहाच्या रूग्णांनी दिवसातून तीन वेळा जेवण केले पाहिजे कारण ते दीर्घकाळ उपाशी राहिल्यास त्यांच्या समस्या वाढू शकतात.
त्याचप्रमाणे, ज्या लोकांना लठ्ठपणाचा त्रास आहे किंवा ज्यांचे वजन सामान्यपेक्षा जास्त आहे त्यांनी दिवसातून दोन-तीन वेळा हलके अन्न खाण्याचा सल्ला दिला जातो.
सकाळच्या नाश्त्यामध्ये प्रथिने आणि जीवनसत्त्वांनी युक्त आहार, दुपारी कमी कॅलरीयुक्त आहार आणि संध्याकाळी पटकन पचणाऱ्या गोष्टींचा समावेश करणं गरजेचं आहे.