अनेकजण फ्रीजमुळे विजेच बिल जास्त येतं म्हणून ओरडत असतात. परंतु तुम्हाला माहित आहे का? आपल्याच चुकीमुळे विजबील जास्त येते. फ्रीज आणि भिंतींमधील असलेल्या अंतरावरुनही कधीकधी जास्त वीज बिल येतं.
फ्रिज हा भिंतीपासून 6 ते 10 इंच दूर ठेवला पाहिजे. फ्रिजच्या मागील बाजूस असलेल्या ग्रीलच्या माध्यमातून उष्ण हवा बाहेर फेकली जाते. त्यामुळेच फ्रिज अगदी भिंतीला चिटकवून ठेऊ नये असं सांगितलं जातं.
जर तुम्ही फ्रिजला भिंतीच्या जवळ ठेवता तर गरम हवा व्यवस्थित बाहेर पडत नाही. अशात फ्रिजला आतून थंड होण्याच्या प्रोसेसला वेळ लागतो. यामुळे तुमचं वीज बिलही वाढू शकतं कारण या प्रोसेस दरम्यान अतिरीक्त विजेचा वापर होतो.
तुम्ही तुमचा फ्रिज भिंतीच्या 6-10 इंचच्या अंतरावर ठेवायला हवे. पण सोबतच आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा ती म्हणजे, फ्रिजला कधीच हीटर किंवा कोणत्याही गरम वस्तूजवळ ठेवू नये.
फ्रिजसंदर्भातील या छोट्या गोष्टींची काळजी घेतली तर तो कमी खर्चामध्ये म्हणजेच वीजेचं बिल आणि मेन्टेन्समध्ये अधिक चांगली सेवा देतो. यामुळे तुमच्या वीज बिलात मोठा फरक तुम्हाला पाहायला मिळेल आणि पैसेही वाचतील.
फ्रिज फार भरू नये. फ्रिजमध्ये उगाच अनावश्यक अन्नाचा साठा ठेवू नये. फ्रिजवर देखील आपण सामान भरून ठेवतो तर ते ठेवू नये. फ्रिजवर जोर येणार नाही याची काळजी घ्यावी.
तसेच फ्रिजला घट्ट प्लास्टिक कव्हर घालू नये. यामुळे देखील फ्रिजमध्ये गरमी निर्माण होऊ शकते. सतत फ्रिज उघड झाप करू नये. कारण हे देखील एक विजेचे बिल जास्त येण्याचे कारण आहे.