how to clean leather jacket : घरच्या घरी कसं स्वच्छ कराल लेदर जॅकेट?
बाईकनं रायडिंगला जाणाऱ्या रायडर्ससाठी तर लेदर जॅकेट म्हणजे जिव्हाळ्याचा विषय. असं हे लेदर जॅकेट वापरताना कमालीचा रुबाब वाटतो. पण, ते स्वच्छ करताना अनेकांच्याच नाकीनऊ येतात.
मुळात लेदर जॅकेट स्वच्छ करत असताना काही गोष्टींची काळजी घेतली जाणं अतिशय महत्त्वाचं आहे. नाहीतर क्षुल्लक चुकांमुळं ते खराबही होऊ शकतं.
शक्य असल्यास लेदर जॅकेट ड्राय क्लिन करून घ्यावं. घरच्या घरी ते स्वच्छ करायचं झाल्यास हलका साबण वापरून स्वच्छ करावं.
लेदर जॅकेट स्वच्छ करण्यासाठी कधीच ब्रशचा वापर करु नका. यासाठी एक विशिष्ट प्रकारचा लेदर क्लिनर स्प्रे मिळतो, त्याचा वापर करावा.
लेदर जॅकेट स्वच्छ झाल्यानंतर ते व्यवस्थित कोरडं करून घ्यावं. कुठंच दमटपणा राहणार नाही याची काळजी घ्यावी.
लेदर जॅकेट वापरत असतानाही बाहेरून आल्यानंतर ते घरात येताच मोकळं करून ठेवावं. जॅकेट पूर्ण कोरडं झाल्यानंतरच ते योग्य जागी ठेवा.