पावसाळा सुरू होताच घरामध्ये कीटकांचा वावर दिसून येतो. त्यामध्ये सगळ्यात त्रासदायक असते घोंगावणारी माशी.
पावसाळ्यात माश्यांमुळे मोठ्या प्रमाणात आजार पसरतात आणि यामुळे होणारे आजार हे संसर्गजन्य असतात आणि लहान मुलांना याची लागण लगेच होते.
पावसाळ्यात सगळीकडे पाणी साचते आणि त्यामुळे माशांचा वावर वाढताना दिसतो. याच माशांपासून काही प्रमाणात सुटका हवी ? तर करा हे '5' उपाय
पुदिनाची पाने सुकवून कपड्यामध्ये गुंडळून त्याचे छोटे गाठोडे घरामध्ये ठेवावेत यामुळे माशा घरात येाणार नाही.
रोज संध्याकाळी धूपासोबत कापूर जाळल्यास माशा कमी होतात. घराच्या सर्व कोप-यात कापूर ठेवा. माशा खूप असतील तर कापूर जाळा.
तुळशीमध्ये भरपूर प्रमाणात औषधी गुणधर्म असतात जे कीटकांना दूर ठेवण्यास मदत करते. त्यामुळे घरात तुळशीचे रोप असावे.
कापसाचा बोळा या तेलामध्ये बुडवून हवाबंद डब्ब्यात ठेवावा आणि कीटक असलेल्या ठिकाणी डब्बा उघडावा यामुळे कीटक येत नाहीत.
लिंबाचे दोन तुकडे करून त्यामध्ये 7/8 लवंग रोवा. लवंगाचे चार कोने असलेली बाजू वरच्या दिशेस ठेवा आणि घराच्या कोप-यामध्ये ठेवा यामुळे माशा घरात येत नाही.