मध शुद्ध आहे की भेसळयुक्त हे तपासण्यासाठी पाण्यामध्ये मधाचे काही थेंब टाका.
जर मध खाली पाण्यात जमा झाले तर ते शुद्ध आहे हे सिद्ध होते.
मात्र जर मध पाण्यात मिसळले गेले तर ते भेसळयुक्त आहे हे सिद्ध होतं.
मध भेसळयुक्त आहे की नाही हे तपासण्यासाठी आयोडीनची गरज आहे.
यासाठी मध पाण्यामध्ये मिसळावे लागणार आहे. त्यानंतर या पाण्यात थोडे आयोडीन टाकावे.
जर या मिश्रणाचा रंग निळा झाला तर यामध्ये स्टार्च किंवा पीठ मिसळले आहे हे समोर येतं.
यामुळे या मधामध्ये भेसळ असल्याचं सिद्ध होतं. आयोडीनच्या मदतीने हे तपासता येतं.