गुळ आणि गव्हाच्या पिठाचा पौष्टक लाडू आरोग्यासाठी सुपरफुड ठरेल.
झटपट बनणाऱ्या हा लाडु हिवाळ्याच्या दिवसांत आरोग्यासाठी लाभदायक ठरतो. जाणून घ्या याची रेसिपी
1 कप गव्हाचे पीठ, दीड कप गुळाची पावडर, 1/2 कप साजूक तुप, ड्रायफ्रुट्स
सगळ्यात पहिले मंद आचेवर कढाईत पीठ भाजून घ्या. त्यानंतर या पीठात बारीक कापलेले ड्रायफ्रुड्स आणि गुळाची पावडर टाका.
त्यानंतर या साहित्यात साजूक तूप टाका. लक्षात घ्या की गरम गरम तूप टाकू नका अन्यथा लाडूचा स्वाद बिघडू शकतो.
आता सर्व साहित्य एकजीव करुन घ्या. साहित्य थोडं थंड झाले की लाडू वळायला सुरुवात करा.
लाडू झाल्यानंतर एका एअरटाइट कंटेनरमध्ये भरुन ठेवा. रोज एक लाडू खाल्ल्याने दिवसभराची उर्जा मिळेल.