गोड खाण्याची इच्छा तर होते पण अतिगोड खाणे आरोग्यास हानिकारकही असते. मात्र, गळ आणि गव्हाच्या पिठापासून बनवलेला हा लाडू तुम्ही केलाच पाहिजेत
हिवाळ्याच्या दिवसांत हा लाडू एखाद्या सुपरफुडप्रमाणेच आहे. झटपट होणाऱ्या या गुळ आणि पीठाचा लाडू बनवून तुम्ही स्टोअर करु शकता.
१ कप गव्हाचे पीठ, दीड कप गुळाची पावडर, 1/2 कप तूप, ड्रायफ्रुट्स
सगळ्यात पहिले कढाईत पीठाला सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्या.
त्यानंतर त्यात गुळाची पावडर टाकून सगळं मिश्रण एकजीव करुन घ्या
त्यानंतर ड्रायफ्रुट्स बारीक करून ते या मिश्रणात मिक्स करा आणि नंतर तूप टाकून सर्व मिश्रण एकजीव करा
त्यानंतर सर्व मिश्रण थंड करुन लाडु वळून घ्या. नंतर एका एअर कंटेनर डब्यात भरुन ठेवून द्या.