मनी प्लांट हा सहसा सगळ्या घरांमध्ये आढळतो.परंतु काहीवेळा त्याची योग्यरित्या काळजी न घेतल्याने त्याची वाढ थांबते.
त्याचप्रकारे पावसाळ्यात पाने पिवळी पडतात किंवा कुजतात. अशा वेळी मनी प्लांट व्यवस्थित ठेवण्यासाठी आणि आर्द्रतेची चांगली वाढ होण्यासाठी या टिप्स करा फॉलो.
जर तुम्ही मनी प्लांट काचेच्या भांड्यात ठेवत असाल तर त्यामधील पाणी दर 10 ते 15 दिवसांनी बदलावे.
कारण पाण्यात असलेले क्षार वनस्पती शोषून घेते. त्यामुळे पाणी बदलणे गरजेचे आहे. जेणेकरून झाडाला अधिक प्रमाणात पोषण मिळेल.
जर तुम्ही एखाद्या कुंडीत मनी प्लांट लावलं असेल तर पाण्याचा निचरा व्यवस्थित होईल याची काळजी घ्यावी. असे न केल्यास झाडाची मुळे कुजतात.
मनी प्लांटची काळजी घेण्यासाठी तुम्ही व्हिटॅमिन ई आणि सी कॅप्सूल मनी प्लांटच्या पाणयामध्ये टाकू शकता.
तसेच जर तुम्ही कुंडीत झाड लावलं असेल तर ही औषधे तुम्ही मातीत मिसळू शकता. ज्यामुळे झाडाची वाढ चांगली होते.
जर पाने पिवळी झाली असतील तर ऑलिव्ह ऑईल, मोहरीचे तेल किंवा बदामाचे तेल हे पाण्यात मिसळून वापरल्याने प्रभावी ठरते.