सुजैनसोबत लग्न करण्याअगोदर करीनाच्या प्रेमात होता ऋतिक
ऋतिकने सांगितलं सत्य
बॉलिवूड हँडसम हंक अभिनेता हृतिक रोशन याची लव लाईफ कायमच चर्चेत राहिली आहे. ऋतिकने सुझैनसोबत लव्ह मॅरेज केलंय. मात्र काही वर्षांनी त्या दोघांनी घटस्फोट घेतला.
पण फार कमी लोकांना माहित आहे की, सुझैन अगोदर ऋतिक रोशनचं नाव करीना कपूरसोबत जोडलं गेलं होतं.
2001 मध्ये 'यादें' सिनेमाच्या वेळी ऋतिक आणि करिना एकमेकांना डेट करत होते.
या दोघांना विमानात रोमान्स करताना पाहिलं होतं. करिनासोबतच्या लिंकअपवर ऋतिक रिऍक्ट देखील केलं होतं.
या घटनेने मी खूप उदास आहे. मीडियाने अशा पद्धतीने गॉसिप करण्यापासून लांब राहायला हवं. या चर्चेने मी खूप दुःखी आहे.
आमचं जर अफेअर असेल तर मी विमानात कशाला रोमान्स करेन. इकोनॉमी क्लासमध्ये मी केबिन क्रूमजवळ लोकांना ऑटोग्राफर देण्यात वेळ घालवतो.
लिंकअपच्या चर्चेनंतर या दोघांच्या नात्यावर परिणाम झाला का? असा प्रश्न ऋतिकला विचारण्यात आला. यावर त्याने दिलेलं उत्तर मजेशीर आहे.
ऋतिक म्हणाला की, करिनापण याच क्षेत्रात आहे. त्यामुळे नावं एकमेकंसोबत जोडलं जाणं ही सामान्य बाबा आहे.